

Buldhana Crime
sakal
देऊळगाव राजा : दोन अल्पवयीन युवकांसह तिघांनी एका युवकावर चाकूने हल्ला करून एका युवकाचा खून केल्याची घटना अंढेरा बाजार गल्लीत ता.२५ ऑक्टोबर रात्री घडली. किरकोळ वादातून तिघा तरुणांनी असोला येथील रहिवासी आकाश उत्तम चव्हाण (वय २२) या युवकाचा चाकूने वार करून खून केला. पोलिसांना अल्पवयीन युवकांसह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.