esakal | हिवाळी अधिवेशन : ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? : देवेंद्र फडणवीस 
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित झाले असता सावरकरांच्या संदर्भात घोषणाबाजी करीत भाजपाचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार जो प्रकार करत आहे तो दुर्दैवी आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात नियम 57 ची नोटीस दिली होती. ती कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

हिवाळी अधिवेशन : ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? : देवेंद्र फडणवीस 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आम्ही सभागृहात काढलेले गौरवोद्गार आज विधिमंडळ कामकाजातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे विधानसभेचे हे सभागृह महाराष्ट्राचे की ब्रिटिशांचे, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष ेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

शिवसेना शांत का?. 
सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित झाले असता सावरकरांच्या संदर्भात घोषणाबाजी करीत भाजपाचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार जो प्रकार करत आहे तो दुर्दैवी आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात नियम 57 ची नोटीस दिली होती.

ती कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या भाषणातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भातील गौरवोद्गार कामकाजातून काढून टाकले. सावरकरांबाबतचे गौरवोद्गार काढत असताना व कामकाजातून ते वगळले जात असताना शिवसेना मात्र शांत बसली होती. त्यांनी यासंदर्भात एकही शब्द उच्चारला नाही. ही सत्तेची लाचारी काय कामाची?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाची बातमी - सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून वातावरण तापले 

हक्कभंग आणला तरी पर्वा नाही 
सावरकर यांच्या बद्दल बोलण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ते देशाचे दैवत आहेत. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल. मात्र, त्यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. आमचा संघर्ष आम्ही सभागृहातही चालू ठेवू. प्रसंगी सभागृहाबाहेरही करू. राहुल गांधी या देशाची माफी मागत नाही, तोपर्यंत हा संघर्ष अविरत सुरू राहील, असे फडणवीस म्हणाले.