देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर! वाचा कारण...

देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर! वाचा कारण...

अमरावती : भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री, विधी मंडळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना टाळून अपक्ष आमदारांच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. आमदार रवी राणा यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी असतानाच फडणवीसांनी त्यांनाच महत्त्व दिल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्याचवेळी अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून फोटो व वृत्त प्रसारित करीत भाजपला धक्का दिला आहे.

भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री सोमवारी (ता. १६) अमरावतीत आले होते. त्यांचे मामेभाऊ अनिरुद्ध कलोती यांचे निधन झाल्याने कलोती कुटुंबीयांना सांत्वना भेटीसाठी ते आले होते. त्यांचा हा शासकीय दौरा नसल्याने त्याबाबतची माहिती फारशी कुणालाच नव्हती. खुद्द भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना किंवा स्थानिक नेत्यांनाही हा दौरा कानावर नव्हता.

देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर! वाचा कारण...
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

कलोती कुटुंबीयांच्या सांत्वनेसाठी आलेले देवेंद्र फडणवीस अपक्ष आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास मात्र जातीने उपस्थित झाले. सुमारे ४५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या राजापेठ रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाची त्यांनी आमदार रवी राणा तसेच युवा स्वाभिमानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पाहणी केली. या पाहणीदौऱ्याचे युवा स्वाभिमान पक्ष व आमदार रवी राणा यांनी चांगलेच भांडवल केले. सोशल मीडियातून छायाचित्रासह जोरदार प्रसिद्धी त्यांनी केली आहे. छायाचित्र बघून भाजपच्या अनेकांना देवेंद्र फडणवीस अमरावतीस आले होते, हे कळले.

देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर! वाचा कारण...
आमदार भुयार यांना शिक्षा; तहसीलदारांना मारला होता माईक फेकून

पक्षाचा राज्यातील सर्वांत मोठा नेता गावात येतो आणि त्याची साधी सूचनाही दिली जात नाही, त्याचवेळी अपक्ष आमदारासोबत पाहणीदौरा करतो, हे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडलेले नाही. दरम्यान, महापालिकेतील पक्षनेते तुषार भारतीय यांनी फडणवीसांच्या दौऱ्याची सूचना मिळाली नव्हती, असे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांचा हा खासगी दौरा असल्याने आम्ही त्यांना भेटायलाही जाऊ शकलो नाही, अशी व्यथा महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केली. शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com