
छत्रपती शिवराय आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. मग शिवरायांच्या जयंती कार्यक्रमावर निर्बंध का? असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.
नागपूर : संविधान वाचलं नाही. महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाहीत, असे लोक अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांच्या पत्रावर टीका करतात. ज्या क्षणी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं, त्या क्षणी राज्यपालाची जबाबदारी आहे. राज्यपालांनी तारीख नेमून द्यावी आणि त्या तारखेला रिक्रेट बॅलेटने हे मतदान व्हावं, संविधानात हा नियम आहे. त्यामुळे सरकारला सवाल आहे, की संविधान त्यांना मान्य आहे की नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज ते नागपुरात बोलत होते.
हेही वाचा - प्रफुल्ल पटेलांच्या महाविद्यालयाला न्यायालयाचा दणका, एका आठवड्यात ५ कोटी भरण्याचे आदेश
काँग्रेसचे कॅबीनेट मंत्री आहेत, त्यांनी ठामपणे भूमिका घ्यायला हवी, हे जनतेला काय मुर्ख समजतात का? जनतेला सर्व समजते, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच आगामी अधिवेशन वादळी होणार असून यामध्ये वीज जोडणी-तोडणीसह अनेक मुद्दे मांडणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - कोरोना लस घेण्यात ग्रामिण पोलिस अव्वल; शहर पोलिसांमध्ये मात्र भीती; अल्पप्रतिसादामुळे...
छत्रपती शिवराय आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. मग शिवरायांच्या जयंती कार्यक्रमावर निर्बंध का? ज्या प्रकारचे निर्णय सरकार घेत आहेत, मग शिवरायांच्या जयंती कार्यक्रमावर निर्बंध असोत, की कोरोनात जनतेच्या पाठीशी उभं राहणे सोडून ७५ लाख लोकांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी नोटीस बजावणे, हे सर्व निर्णय मेघालाई नाही तर काय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच इंधन दरवाढीविरोधातही महाविकास आघाडी सरकारवरच टीका केली. राज्य सरकारने कर कमी केले नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कायम असल्याचे फडणवीस म्हणाले.