esakal | फडणवीस यांचा इशारा, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास आंदोलन करणार
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीस यांचा इशारा, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास आंदोलन करणार

फडणवीस यांचा इशारा, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास आंदोलन करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दरवर्षी धान खरेदीची (Buy grain) घोषणा होतो; मात्र खरेदी नाही. धान उत्पादन शेतकरी संकटात असताना हा प्रकार घडत आहे. धान खरेदी केंद्रात मोठा भष्टाचार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास कोरोनाचे नियम पाळून आंदोलन करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी दिला. (Devendra Fadnavis said, If the farmers are ignored, there will be agitation)

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २६) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी कोरोना काळात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाने केलेल्या कामाचा व व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर ते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धान उत्पादक शेतकऱ्यावर भाष्य केले.

हेही वाचा: Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

देवेंद्र फडणवीस यांनी धान खरेदी आणि कोरोना या दोन्ही विषयांसंदर्भात जिल्ह्याचा आढावा घेतला. यापूर्वी त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. कोरोनाच्या संदर्भात भंडाऱ्याची परिस्थिती गंभीर होती. आता कुठे जिल्ह्याला दिलासा मिळतो आहे. मात्र, तिसऱ्या लाटेसाठी तयारी करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण देखील आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना सर्जरीसाठी नागपूरला पाठविले जाते. त्यांचे लवकर निदान होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी बंद आहे. अद्याप शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर बोनस मिळावा आणि धान खरेदी सुरू करावी, असेही फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांचे डोके चक्रावले

उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाइन सातबारा नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली असली तरी धानाचे खरेदी प्रक्रियेवरून शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. धानखरेदी शासनावर बंधनकारक नसल्याचे पत्रात नमूद केल्याने गेल्यावर्षातील खरीप हंगामातील लॉलीपॉपचे चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आले आहे. यामुळे शेतकरी थेट दलालांच्या दारात पोहोचले आहेत. शासनाच्या या पत्राने शेतकऱ्यांचे डोके चक्रावले आहेत.

(Devendra Fadnavis said, If the farmers are ignored, there will be agitation)