देवेंद्रजी आपण पुन्हा आलात... आपण पुन्हा आलात... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते, "मी पुन्हा येईन...' आणि ते आले. त्यांनी आमचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवला आहे. महाजनादेश यात्रेत ते बोलले ते संपूर्ण विचार करूनच. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री होती की फडणवीसच मुख्यमंत्री होतील. देवेंद्रची आपण पुन्हा आलात, आपले स्वागत आहे, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस जनजनाच्या मनामध्ये असलेले नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षात राज्याने प्रगती केली. पाच वर्ष यशस्वीपणे सरकार चालवून राजी-नाराचीच्या राजकारणात ते हीरो ठरले. आच सकाळीच त्यांनी राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय नेत्यांसर जनतेलाही आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendraji you are back again