Mega River Flood: पुरामुळे अडकले होते बीड जिल्ह्यातील भाविक; काजळेश्वर मठ देवस्थानात घेतला आसरा
Maharashtra Rain: बैतूल जिल्ह्यातल्या जोरदार पावसामुळे मेघा नदीला पूर आल्याने बीड जिल्ह्यातील भाविक काजळेश्वर मठात अडकले. पुराचे पाणी ओसरल्यावर ते सकाळी गावी परतले.
शिरजगावकसबा : बैतूल जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मेघा नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे देऊरवाडा काजळेश्वर देवस्थानात दर्शनासाठी आलेले बीड जिल्ह्यातील भाविक रात्रभर देवस्थानामध्येच मुक्कामी राहिले.