
अमरावती : भारतात ड्रोन वापरण्याचे नियम कठोर असतानाही चिनी बनावटीच्या ड्रोनचा बाजारात सुळसुळाट झाला असल्याचे समोर आले आहे. देशी बनावटीच्या ड्रोन निर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या व राष्ट्रीय सुरक्षा तसेच हिताच्या दृष्टिकोनातून परदेशातून विशेषतः चीनमधून ड्रोन किंवा सुट्या भागाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अशाही स्थितीत देशभरात आठ हजार सातशे चिनी बनावटीच्या ड्रोनची नोंदणी झाली असल्याचे उघडकीस आले आहे.