Domestic Violence: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन
Mental Harassment: धाड येथे स्वाती तुषार गोरे (वय २५) या विवाहित महिलेने जीवन संपवले ; पती, सासू, सासरे व दीर यांच्यावर छळ करून जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा. कुटुंबातील सातत्याने मानसिक त्रास आणि अवाजवी मागण्यांमुळे ही घटना घडल्याची तक्रार.
बुलडाणा : धाड येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा धाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.