'आरक्षण द्या अन्यथा मंत्र्यांच्या घरात सोडू मेंढरे'; मागणी मान्य होण्यासाठी धनगर समाज आक्रमक

सुरेंद्र चापोरकर 
Sunday, 27 September 2020

यासंदर्भात ऍड. दिलीप एडतकर यांनी सांगितले, की महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता,

अमरावती : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या सवलती केवळ केंद्र सरकारच देऊ शकते. त्यामुळे भाजपच्या सरकारने धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडून तसेच घंटानाद करून आरक्षणाची मागणी बुलंद करण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

लघुपटाच्या नायिकेनेच लावला निर्मात्याला लाखोंचा चुना

यासंदर्भात ऍड. दिलीप एडतकर यांनी सांगितले, की महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता, तथापि तसा समावेश असताना धनगर या शब्दातील शेवटचे अक्षर र ऐवजी ड टाकण्यात आल्याने धनगर समाजाला आजवर अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या नाहीत. 

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचे अधिकार केंद्राला असून राज्य सरकारनेही केंद्रावर आरक्षणासाठी दबाव टाकणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या सरकारने धनगर समाजाला जी आश्‍वासने दिली होती, त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी, अशी मागणी करण्यात आली. 

धनगर समाजाच्या आरक्षणाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी (ता.28) धनगर समाजबांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल तसेच 5 ऑक्‍टोबरला प्रत्येक तालुक्‍यात संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांना धनगर बांधवांतर्फे मागणीचे निवेदन देण्यात येईल, अशी माहिती ऍड. दिलीप एडतकर यांनी दिली. 

नाव, वय आणि धर्मामध्ये बदल करायचा आहे? चिंता करू नका; आता आले पर्यावरणपूरक ऑनलाइन 'राजपत्र'!

पत्रकार परिषदेला उमेश घुरडे, रमेश ढवळे, ज्ञानेश्‍वर ढोमणे, बाळासाहेब कोराटे, डॉ. काळमेघ, छबू मातकर, शारदा ढोमणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar community get angry over giving reservation