ब्रेकिंग : अमरावतीच्या धारणीत अग्नितांडव; १५ दुकाने जळून खाक, पुंजी भस्मसात

Dharani Agnitandav of Amravati
Dharani Agnitandav of Amravati

धारणी (जि. अमरावती) : येथील बस स्थानक लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील सर्व्हे नं. १२६ मधील एका दुकानाला अचानक आग लागली. या आगीत अंदाजे १५ दुकाने जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण शॉर्टसर्किट सांगण्यात येत आहे. आगीत कापडाची, किराणा व मेडिकल दुकानात ठेवलेला लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने सर्व व्यापारी वर्ग एक दिवस अगोदर आपल्या दुकानात जास्त प्रमाणात माल साठवून ठेवतात. यातही आजचा बाजार दिवाळी नंतरचा घुंगडू बाजार होता. त्यामळे हा वर्षभराचा सर्वात मोठा आठवळी बाजार मानला जातो. व्यापारी वर्ग या बाजाराची पूर्वीपासूनच तयारी करून ठेवतात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानात मोठा स्टॉक होता.

एका दुकानात लागलेल्या आगीने काही क्षणातच दहा ते पंधरा दुकानांना आगीत भस्मसात केले. मुख्य मार्गावर असलेल्या या दुकानात मुख्यत कपड्यांची दुकाने जास्त प्रमाणात असल्यामुळे आगीने लवकर पेट घेतला. कपडा व्यावसायिकांना आपल्या दुकानातील कपड्याच्या चिंदाही वाचवत आला नाही. या लाईनमध्ये कपड्यांची, किराणा, मिठाई, मेडिकल स्टोअर्स, टेलर यांची दुकाने असून सुंपूर्ण दुकाने आगीत भस्मसात झाली आहेत.

मेळघाट क्लॉथ, विपीन क्लॉथ, सोनू फॅशन, बिकानेर मिष्टान्न, अंबिका क्लॉथ, अंबिका ड्रेसेस, शू ट्रक या दुकानांचे पूर्णतः नुकसान झाले. आगीची सुरुवात होताच विजयपाल कडू व बंटी ठाकरे या दोन व्यापाऱ्यांनी धारणी पोलिस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनला तत्काळ माहिती देऊन स्वतः आज विझवण्याचे कामाला सुरुवात केली होती.

परंतु, आगीचे स्वरूप इतके भीषण होते की दहा ते १५ मिनिटांत सगळ्या दुकानंपर्यंत आग पोहोचली व कोणीही काही करू शकले नाही. धारणी अग्निषमक विभागाची गाडी येण्यापूर्वीच आगीने जवळपास सर्व दुकानांना आपल्या चपेटमध्ये घेतले होते.

सहायक जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी, आयपीएस निकेतन कदम धारणी पोलिस अधिकारी कर्मचारी, तहसीलदार आधिनाथ गांजरे व तहसील कर्मचारी, नगर पंचायतचे कर्मचारी, नागरिकांनी जीवतोड मेहनत घेतली पण आगीवर वेळेवर नियंत्रण करता आले नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com