

Amravati
esakal
धारणी (जि. अमरावती): धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे रविवारी (ता. ५) दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत जीर्ण झालेला वीज खांब बैलगाडीवर कोसळून शेतकरी दाम्पत्यासह दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून महावितरणाच्या कथित निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.