बुलडाणा येथेही मतांची तफावत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

बुलडाणा : अकोला लोकसभा मतदार संघाप्रमाणे बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि प्रशासनाकडून दिलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये ५८३ मतांची तफावत आढळली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे.

बुलडाणा : अकोला लोकसभा मतदार संघाप्रमाणे बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि प्रशासनाकडून दिलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये ५८३ मतांची तफावत आढळली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे.

अकोलानंतर आता बुलडाणा येथील मतांची तफावत चर्चेत आली आहे. १८ एप्रिलला बुलडाणा लोकसभेसाठी मतदान झाले. यावेळी ईव्हीएम मशीनीमध्ये ११ लाख १७ हजार ४८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने दिली होती. त्यानंतर 23 मे ला मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी ईव्हीएम मशीनीमधून ११ लक्ष १८ हजार ६९ मते मोजल्या गेली आहेत. दोन्ही आकडेवारीत ५८३ मतांची तफावत आढळली आहे . दोन्ही आकडेवारीत तफावत समोर आल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनीनी याबाबत आक्षेप घेतला आहे.  राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निवडणूक प्रतिनिधी अॅड. धीरज मुंडे यांनी ५८३ मतांची तफावत का आढळून आली, याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.

वंचितचा सुध्दा आक्षेप
ईव्हीएमबाबत सुरवात पासून आणहह घेतल्या जात आहे. निवडणूक प्रक्रिया तसेच ईव्हीएम मशीनवर नागरिकांचा विश्वास बसण्यासाठी व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी करणार असल्याची माहिती भारिप जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे यांनी दिली.

अकोला व बुलडाणा येथे तफावत
अकोला व बुलडाणा मतदार संघात प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी नंतर मतांची आकडेवारी यात तफावत असल्याने निवडणूक विभागाकडे आक्षेप घेण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनबाबत वारंवार शंका घेतल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मतांची तफावत आढळून आल्याने निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागीलते जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: difference in votes at Buldana also