esakal | धमकीसाठी महिलेकडून संजय राठोड यांच्या नावाचा वापर, पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

मृत अनिल उबाळे

धमकीसाठी महिलेकडून संजय राठोडांच्या नावाचा वापर, कर्मचाऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : दिग्रस नगरपालिकेतील (digras municipal corporation) एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने महिला ब्लॅकमेल करीत असल्याने तिच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची (employee suicide digras) घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात मृत्यूनंतर न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. तर विष घेत असल्याने त्याने फोनवर काकुला सांगितले असून विष घेतल्याची माहिती आईला दिली आहे. हे दोन्ही ऑडिओ सुद्धा समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. यात संजय राठोड साहेबांचे नावाचा उल्लेख असून ब्लॅकमेल करणारी महिला ही शिवसेनेची पदाधिकारी असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. अनिल अशोक उबाळे असे आत्महत्या केलेल्या नगर पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा: 'तुमचा भुजबळ करू' म्हणणाऱ्यांना भुजबळांचा टोला, म्हणाले...

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करून अनिल उबाळे यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला फाशी झाली पाहिजे, या मागणीसाठी अनिलच्या नातेवाईकासह नागरिकांनी पोलीसस्टेशन समोर ठिया मांडला आहे. अजून गुन्हा दाखल व्हायचा आहे. सदर ब्लॅकमेल करणारी महिला ही शिवसेनेची दिग्रस येथील उपशहरप्रमुख असल्याचे अनिलने व्हिडिओमध्ये सांगितले. तसेच तिच्या नावाचा उल्लेख करीत ती संजय राठोड यांचा धाक दाखवित गेल्या सात वर्षांपासून ब्लॅकमेल करीत असल्याचे म्हटले आहे. तिच्या जाचामुळे आपले जीवन उध्दवस्त झाल्याने आत्महत्या करीत असल्याचेही त्यांनी व्हिडिओत सांगितले आहे. तसेच सदर महिलेने पाच लाख रुपयांची खंडणी मगितली असून आपण दोन लाख रुपयांची जुळवाजुळव केली असून तीन लाख रुपये आता देऊ शकत नसल्याचेही अनिल सांगत आहे. त्यामुळे आत्महत्या करीत असून मला माझ्या मित्र मंडळी व नातेवाईकांनी मृत्यूनंतर न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीही केली आहे.

काकू व आईशी साधला संवाद -

अनिलने सर्वात आधी काकुला फोन करून त्या महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची माहिती फोनवरून दिली. त्यात काकूने घरी येतो आपण बोलू, आत्महत्या करू नकोस अशी गळ घातली. तर आपण विष घेतल्याची माहिती त्यांनी सर्वप्रथम आईला दिली, हे ऐकून आईने त्याला असे करू नकोस असे म्हटले. त्याने आईला न्याय मिळवून दे अशी विनंतीही केली.

भावाच्या बायकोच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा केली व्यक्त

काकुशी फोनवरून संवाद साधताना अनिलने माझ्या भावाची बायको गर्भवती असून मृत्यूनंतर मी तिच्यापोटी जन्म घेईन अशी इच्छा व्यक्त केली. हा ऑडीओसुद्धा व्हायरल झाला आहे

loading image
go to top