अरेच्च्या! हा बाबा तर निघाला चार बायकांचा दादला, आता पळवली पाचवी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

दिनेशचंद्र मोहतुरे महाराज हा सावनेर तालुक्‍यातील खुबाडा येथील रहिवासी आहे. मोहदुरा येथे 27 जानेवारी ते तीन फेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तरुणतुर्क असणाऱ्या महाराजाने कथावाचनातून गावकऱ्यांना भुरळ घातली होती.

भंडारा : भागवत सप्ताहासाठी आलेल्या महाराजाने गावातील विवाहितेला पळवून नेल्याची घटना मोहदुरा येथे घडल्यानंतर एकच खळबड उडाली होती. विवाहबाह्य नात्याचा रास रचणाऱ्या तथाकथित दिनेशचंद्र महाराज याला व विवाहितेला भंडारा पोलिसांच्या पथकाने वृंदावन (मथुरा, उत्तर प्रदेश) येथे पकडले. त्यांना घेऊन पोलिस सोमवारी भंडारा येथे दाखल होतील. या महाराजाला चार बायका असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिनेशचंद्र मोहतुरे महाराज हा सावनेर तालुक्‍यातील खुबाडा येथील रहिवासी आहे. मोहदुरा येथे 27 जानेवारी ते तीन फेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तरुणतुर्क असणाऱ्या महाराजाने कथावाचनातून गावकऱ्यांना भुरळ घातली होती. यानंतर त्याने गावकऱ्यांशी जवळीक वाढवली. दिनेशचंद्र मोहतुरे या तथाकथित हभप महाराजाने भागवत सप्ताह आटोपताच दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी (ता. 5) गावातील एका विवाहित महिलेसह पलायन केले होते. 

क्लिक करा - जात होते डॉक्टरकडे, वाटेत कर्दनकाळ ठरला ट्रक..

पत्नीला घेऊन पसार झालेल्या दिनेशचंद्रविरुद्ध महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. महाराजाचा शोध घेत पती व कुटुंबीय पोलिसांसह खुबाडा येथे पोहोचले. मात्र, महाराज गावी नव्हता. मोबाईलवर संपर्क केला असता त्याने वृदांवन येथे असल्याचे सांगितले. तसेच महिलेसोबत असल्याचे कबूल करून महिलेच्या पतीला धमकावले होते. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून त्यांचा शोध घेतला. 

चौघांनी सोडले तर पाचवी पळवली

महाराज विवाहित असून, त्याला चार बायका होत्या. त्याच्या स्त्री लंपटपणामुळे व बदफैलीपणाला कंटाळून चारही बायका निघून गेल्याचे समजले. भंडाऱ्यात भागवतासाठी आला असता त्याने एकाची बायको पळूवन नेली. यामुळे गावात चांगलीच चर्चा होती.

हेही वाचा -  लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनटालकास अटक

महिलेला स्वीकारण्यास कुटुंबीय तयार

महाराजाच्या या कृतीने गावाचे नाव बदनाम झाले आहे. तसेच त्याने आमचा विश्‍वासघात केला आहे. भाविकांच्या भावनांशी खेळणाऱ्या तसेच आया बहिणींवर डोळा ठेवणाऱ्या दिनेशचंद्रला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी कडून होत आहे. पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलीसाठी सुनेचे पाउल वाकडे पडूनही तीला स्वीकारण्यास पती व कुटुंबातील लोक तयार आहेत. त्यामुळे समोर काय घडते याची उत्सुकता मोहदुरावासींना लागलेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dinesh Chandra Maharaj in Bhandari arrested