अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी; काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष

Dinosaurs used to give their eggs at Salburdi in amravati
Dinosaurs used to give their eggs at Salburdi in amravati

अमरावती : असे म्हणतात पृथ्वीवर तब्बल १९ कोटी वर्षांपूर्वी डायनासोर नावाचे प्राणी राहत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून डायनासोर, त्यांच्या प्रजाती, त्यांचे राहणीमान आणि त्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत संशोधन सुरु आहे. शास्त्रज्ञांना अनेकदा डायनासोरबाबतचे पुरावेही मिळाले आहे. मात्र यापैकी सर्वात महत्वाचा पुरावा मिळाला तो म्हणजे सालबर्डीत.    

२०१३ साली विदर्भातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या सालबर्डीमध्ये डायनासोरच्या आकाराची हाडे आणि अंड्यांचे जीवाष्म सापडले होते. तेव्हापासूनच इथे संशोधन सुरू करण्यात आले होते. या संशोधनात  मादी डायनासोर या ठिकाणी अंडी घालत असत, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. विदर्भात आढळणारे डायनासोर हे सोरोपॉडा प्रजातीचे असावेत असा युक्त‌िवाद शास्त्रज्ञ करीत आहेत.

हे सत्य शहरातील भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या जीवाश्म विज्ञान शाखेने केलेल्या अभ्यासातून समोर आले होते. अमरावती विद्यापीठाच्या भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील ए.के. श्रीवास्तव आणि आर.एस. मानकर यांनी सर्वप्रथम यावर शोधप्रबंधातून प्रकाश टाकला होता.

सोरोपॉडा या प्रजातीचे डायनासोर हे एकावेळेस दहा किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालत असत. एक अंडं घातल्यावर दुसरे अंडे देताना  डायनासोर वर्तुळ मार्गाने फिरून एका वर्तुळात अंडी देत असत. शास्त्रज्ञांनी केलेलय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे.  

अंडी उबण्यासाठी करत होते या खडकाची निवड 

डायनासॉरची अंड्यांचे वजन त्यांच्या शरीराप्रमाणेच खूप जास्त प्रमाणात असायचे. त्यामुळे मादी डायनॅसोरला या अंड्यांवर बसून त्यांना उबवणे शक्य नव्हते. त्यामुळे अंडी देण्याकरिता डायनासोर एका विशिष्ट खडकाची म्हणजेच वाळूच्या खडकाची निवड करत असत. हा खडक दिवसभरात उष्णता शोषून घेऊन रात्रीच्या वेळीही डायनासॉरच्या अंड्यांना उष्णता पुरवत असे अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.  

सालबर्डीत सुरु असलेले संशोधनाचे काम अजूनही सुरु आहे आणि संशोधक डायनासॉरच्या रहाणीमानातील अधिक पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com