Amravati News: दिव्यांग युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला; वाई जंगलातील घटना : मध्य प्रदेशातून होती बेपत्ता
Missing woman MP: मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेल्या दिव्यांग युवतीचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील वाई जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला. १८ दिवसांनंतर उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वरुड : अठरा दिवसांपूर्वी मध्य प्रदेश येथील पेंडोनी (जि. पांढूर्णा) येथून हरविलेल्या दिव्यांग युवतीचा कुजलेला मृतदेह सोमवारी (ता. १५) जिल्ह्यातील शेंदूरजनाघाट हद्दीत वाई जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली.