निराशा पदरी पडली अन्‌ युवतीने उचलले हे पाऊल 

nagpur suicide
nagpur suicide

नागपूर : सोबतच अभ्यास केला, मेहनत घेतली मात्र मैत्रिणीला नोकरी लागली, आपल्याला का नाही, या विचाराने नैराश्‍य आलेल्या दुसरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नागपुरातील गणेशपेठ परिसरात उघडकीस आली. डोडो ऊर्फ पौर्णिमा राजू सांगोरे (वय 22, रा. पंचशील नगर, भद्रावती) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. 

भावी परिचारिकेचा करुण अंत 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौर्णिमा सांगोरे ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आई-वडिलांनी मुलीला पायावर उभे राहता यावे, म्हणून व्यावसायिक शिक्षण देण्याचे ठरविले. त्यामुळे पौर्णिमा हिला नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तीन वर्षांचा कोर्स करीत असतानाच तिची क्‍लासमेट मेघा करणदास मेश्राम (वय 22, लालापेठ कॉलनी, चंद्रपूर) हिच्याशी भेट झाली.

दोघींनीही सोबतच शिक्षण घेतले. एकमेकींना अभ्यासात मदत करीत पदवी पूर्ण केली. त्यानंतर जॉब मिळविण्यासाठी त्या दोघीही दीड वर्षापूर्वी नागपुरात आल्या. त्यांनी गणेशपेठमधील गंजीपेठ, पाटीलपुरा परिसरातील दीपक सुपारेंच्या घरी किरायाने रूम घेतली. 

गणेशपेठमधील घटना 
दोघीही रात्रंदिवस अभ्यास करायला लागल्या. दोघींना एकाच ठिकाणावरून नोकरीसाठी बोलावण्यात आले. मात्र एकीला नोकरी मिळाली. दोघींनीही सारखीच मेहनत घेतल्यानंतरही केवळ मैत्रिणीला जॉब मिळाला. त्यामुळे दुसरी नैराश्‍यात गेली. गेल्या आठ दिवसांपासून ती तणावात गेली. मैत्रीण रोज टापटीपपणे नोकरीवर जाऊ लागली तर ती घरात बसून तणाव सहन करीत होती. शेवटी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणीला सकाळी ड्यूटीवर जाऊ दिले आणि तिने घरात गळफास लावून जीवनयात्रा संपविली.

एकीचे सिलेक्‍शन, दुसरी रिजेक्‍ट 
पौर्णिमा आणि मेघा यांचा बराच अभ्यास झाला होता. दोघींनाही एका हॉस्पिटलमध्ये जॉबसाठी ऑफर आली. त्यांनी मुलाखतीसाठी तयारी केली. दोघींनीही मुलाखत चांगली दिली. मात्र, मेघाचे सिलेक्‍शन झाले आणि पौर्णिमाला रिजेक्‍ट करण्यात आले. त्यामुळे पौर्णिमा खचून गेली. ती नैराश्‍य आणि तणावात वावरत होती. आपण कुठे चुकलो, असे तिला नेहमी वाटत होते. 

टोकाचे पाऊल 
नवीन जॉबवर मेघा रोज जाऊ लागली तर पौर्णिमा घरी राहत होती. मेघाने तिला धीर देत हार न मानता पुन्हा प्रयत्न कर, असा सल्ला दिला. मात्र, ती गेल्या आठ दिवसांपासून तणावात दिसत होती. सोमवारी दुपारी मेघा ड्यूटीवर गेली होती. दरम्यान, हिच्या मनात आत्महत्येचा विचार आला. तिने घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com