esakal | पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न

बोलून बातमी शोधा

file image
पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न
sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी होऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.11) सायंकाळी येथील आर्णी रोडवरील दोस्ती हॉटेल व अमराईपुरा येथे घडली.

पूर्ववैमनस्यातून तरुणाला शिवीगाळ करीत धारदार चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आर्णी रोडवरील दोस्ती हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. याप्रकरणी रवी विठ्ठल धनोडे (वय 32, रा. तारपुरा) याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गोलू उर्फ अजय सोलंकी (वय 28, रा. अमराईपुरा) याच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला तर, त्याच दिवशी रात्री आठच्यादरम्यान विरोधी गटातील चौघांनी अमराईपुरा येथे धडक दिली. सोलंकी याच्या घरात शिरून धारदार चाकूने युवकावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महिलेने मुलास मागे ओढून मागच्या दरवाजातून पळवून लावले. याप्रकरणी किरण सोहनसिंग सोलंकी (वय 40, रा. अमराईपुरा) या महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून विक्की उर्फ टिंक्‍या पवार (वय 22, रा. तारपुरा) याच्यासह अन्य तिघांविरिुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा - नागपुरात अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप; मात्र, पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

धर्माजीनगरात प्राणघातक हल्ला -

पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याच्या उद्देशाने युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (ता.12) दुपारी एकच्यादरम्यान धर्माजीनगरात घडली. याप्रकरणी रोशन उर्फ सोनू संतोष राठोड (वय 18, रा. धर्माजीनगर, वडगाव) याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सतीश शेळके (रा. वडगाव) याच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा - बापरे! प्रश्नपत्रिकेसोबतही मिळतात उत्तरेही, पदव्युत्तर परीक्षा ठरताहेत नावापुरत्या