
एकीकडे जिल्हा परिषद निवडणूकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे. तर वंचित बहुजन आघाडीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तिकिट वाटपावरून अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणारे रविवारी हाणामारीत पर्यावसन झाले. तिकिट कापल्याचा रोष व्यक्त करीत दोन पदाधिकाऱ्यांची अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कृषी नगरातील बंगल्यासमोरच हाणामारी झाली. या घटनेची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.
अकोला : एकीकडे जिल्हा परिषद निवडणूकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे. तर वंचित बहुजन आघाडीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तिकिट वाटपावरून अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणारे रविवारी हाणामारीत पर्यावसन झाले. तिकिट कापल्याचा रोष व्यक्त करीत दोन पदाधिकाऱ्यांची अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कृषी नगरातील बंगल्यासमोरच हाणामारी झाली. या घटनेची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यावरून वंचित बहुजन आघाडीत खदखद सुरू आहे. पक्षाविरोधात बंडखोरी करीत अपक्ष तर काहींनी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी दाखल केली. या बंडखोरीची परिणाम पक्षाच्या कामगिरीवर होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक समिती नेमली. समितीने काहींची मनधरणी करण्यात यश मिळविले. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याचा रोष कमी होताना दिसत नाही. हा रोष रविवारी पुन्हा उफाळून आला. त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.
नेमके काय घडले?
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व पूर्वाश्रमीच्या भारिप बहुजन महासंघात सम्राट सुरवाडे पंचविस वर्षांपासून कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. हक्काचा मतदारसंघात त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षनेत्यांचा विश्वास असल्यानंतरही केवळ काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मिळू न दिल्याचा संशय त्यांना होता. या नैराश्येतूनच रविवारी त्यांचा एका पदाधिकाऱ्यासोबत वाद झाला व त्यातूनच हाणामारी झाल्याची माहिती आहे.