कोरोनायोद्धा डॉक्‍टर कर्तव्य बजावून घरी जात होते, त्याचवेळी झाला घात 

सायराबानो अहमद 
Sunday, 4 October 2020

धामणगावपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शनिवारी (ता. तीन) रात्री १० वाजताच्या सुमारास यवतमाळ बायपास रस्त्यावर अपघातग्रस्त दुचाकीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्‍टरचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना धामणगाव-यवतमाळ बायपास रस्त्यावर शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. 

अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाने हाहाकार उडविला असतानाच या काळात कोरोना योद्धा म्हणून डॉ. नितीन वेणूदास भारशंकर (वय ४८) हे अमरावती येथील सुपर स्पेशालिटी दवाखान्यात कर्तव्य बजावत होते. आपले कर्तव्य बजावून तो अमरावती येथून आपल्या राहत्या घरी धामणगाव रेल्वे येथे मोटारसायकलने परत येत होते. 

"आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?

धामणगावपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शनिवारी (ता. तीन) रात्री १० वाजताच्या सुमारास यवतमाळ बायपास रस्त्यावर अपघातग्रस्त दुचाकीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. 

#SundaySpecial : `झणझणीत सावजी मटण` खाल्ल का... वाचा मग कसा झाला जन्म 
 

येथील स्मशानभूमीत रविवारी (ता. चार) त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत डॉ. नितीन भारशंकर यांची पत्नी डॉ. कल्पना भारशंकर या निंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A doctor coming from hospital dead in an accident near Dhamangaon