esakal | लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही आदिवासींसाठी झटणारे गोगुलवार दाम्पत्य पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

doctor Gugulwar and his wife corona positive even after second dose in Gadchiroli

डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागांतील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था स्थापन करून कार्य करीत आहेत

लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही आदिवासींसाठी झटणारे गोगुलवार दाम्पत्य पॉझिटिव्ह

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गडचिरोली : कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक तथा आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सध्या दोघेही येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचार घेत आहेत.

दुर्दैवी भावाला बघता आलं नाही बहिणीचं लग्न, पत्रिका वाटायला गेला अन् सर्वच संपलं

डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागांतील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था स्थापन करून कार्य करीत आहेत. त्यांचे निवासस्थान व कार्यालय कुरखेडा येथे आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता त्यांनी आधीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. 

फेब्रुवारी महिन्यातच त्यांचे या लसीचे दोन्ही डोज पूर्ण झाले होते. तरीही त्यांना कोरोनाने गाठले. बुधवारी (ता. ७) डॉ. गोगुलवार व शुभदा देशमुख यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल गुरुवारी (ता. ८) सायंकाळी प्राप्त झाला. अहवालात दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे नमूद होते. त्यानंतर गुरुवारी रात्रीच त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील कोरोना कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी पक्षातर्फे साक्ष...

धोका कमी होतो 

यासंदर्भात डॉ. सतीश गोगुलवार यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना संसर्ग झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोघांचीही प्रकृती बरी आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, याची खात्री नाही. मात्र, ही लस घेतल्यावर कोरोना झाल्यावरही या आजारातून लवकर बरे होण्यास मदत मिळते. कोरोनाचा धोका कमी होतो, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 


 

loading image