esakal | अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी पक्षातर्फे साक्ष नोंदणी पूर्ण; ऍड. उज्वल निकम यांची माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

या प्रकरणात एकूण 29 साक्षीदार तपासण्यात आले असून सरकारी पक्षातर्फे पुरावे नोंदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील ऍड. उज्वल निकम यांनी दिली.

या प्रकरणात एकूण 29 साक्षीदार तपासण्यात आले असून सरकारी पक्षातर्फे पुरावे नोंदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील ऍड. उज्वल निकम यांनी दिली.

अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी पक्षातर्फे साक्ष नोंदणी पूर्ण; ऍड. उज्वल निकम यांची माहिती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा): प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणात आज तीन जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून हिंगणघाट अति. जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन साक्ष नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण 29 साक्षीदार तपासण्यात आले असून सरकारी पक्षातर्फे पुरावे नोंदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील ऍड. उज्वल निकम यांनी दिली.

अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात आज तीन जणांची साक्ष नोंदविण्यात आली. यात पोलिस निरीक्षक सत्याविर बंडीवार, मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव व जिओचे नोडल अधिकारी फ्रांसिस परेरा यांची साक्ष पूर्ण झाली. तर बचाव पक्षाकडून तपास अधिकारी तृप्ती जाधव यांची उलट तपासणी वेळेअभावी होऊ शकली नाही. ती उद्या होणार आहे. 

मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाची दुर्दशा; एकही कचराकुंडी नाही; प्रशासनाचं अक्षम्य...

अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज सकाळी 11 वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. दुपारी 3.30 वाजतापर्यंत या प्रकरणाचे सलग कामकाज चालले. सुरुवातीला या प्रकरणात पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांची उलट तपासणी पूर्ण झाली. जियो कंपनीचे नोडल अधिकारी फ्रासिंस परेरा, पुणे यांची कोरोना प्रादुर्भावाचे संकटामुळे ते प्रत्यक्ष न्यायालयात हजर न राहू शकल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. 

त्याचप्रमाणे वोडाफोन आयडियाचे नोडल अधिकारी यांची याआधीच्या सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंद करण्यात आली होती. अंकिताच्या आईने आपल्या साक्ष नोंदीत न्यायालयासमोर सांगितले होते की, आरोपीने माझ्या मुलीला भ्रमनध्वनीवरुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. आज त्या साक्षीची पुष्टी करण्याकरिता मोबाईल कंपनीचे नोडल अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यांनी आपल्या साक्षीत 1 मार्च 2020 रोजी 8 वाजून 08 मिनिटांनी आरोपी विक्की नगराळे व मृत अंकिता पिसुड्डे यांच्यात 40 सेंकदाचे संभाषण झाले असल्याचे सांगितले. 

400 हातपंप दुरुस्तीसाठी फक्त एकच युनिट, आदिवासी बांधवांना पाणीटंचाईतून मुक्ती मिळेल का?

विशेष म्हणजे हिंगणघाट जिल्हा न्यायालयात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली, असे ख्यातनाम विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. न्यायालयीन कामकाजात त्यांना स्थानिक अति. जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ऍड. दीपक वैद्य यांनी सहकार्य केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image