डॉन आंबेकरच्या परराज्यांतील गुन्हेसाम्राज्यावरही येणार टाच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

नागपूर : स्वयंघोषित डॉन संतोष आंबेकरने उपराजधानीतील गुन्हेगारी विश्‍वात आपले नाव अधोरेखित केले. त्यानंतर मुंबईत आणि परराज्यातही त्याने गुन्हेसाम्राज्याचा विस्तार केला. अनेकांना धमकावून भुखंड, रक्कम उकळली. पण, भीतीमुळे आतापर्यंत सारेच बुक्‍क्‍यांचा मार सहन करीत होते. आता पोलिसांनीच संतोषला पुरते जेरीस आणल्यानंतर तक्रारकर्तेही समोर येऊ लागले आहेत. परराज्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. 

अडचणीतील संपत्ती लाटण्यासाठी मदत करायची. त्यानंतर धमकावून खंडणी उकळायची. शक्‍य होईल तिथे कोणत्याही गुंतवणुकीशिवाय केवळ दबाव आणून भागीदार म्हणून नाव जोडायचे, अशी खंडणीखोर व ठकबाज संतोषची कार्यपद्धती आहे. गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांना मुंबई जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली पाच कोटींनी फसविले. त्यांनी पैसे परत मागितले असता धमकावून एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. गुजरातचेच व्यवसायी हेमंत पुरोहित यांचीसुद्धा 15 लाखांची फसवणूक केली. सराफा व्यापारी राजा अरमरकर याच्या माध्यमातून अनेक सराफा व्यापाऱ्यांनाही त्याने गंडा घातला. हवाला व्यापारातूनही मोठी कमाई केली. एक एक करीत त्याच्या विरोधातील गुन्ह्यांची यादी वाढतच आहे. अन्य राज्यांमध्येही त्याने गुन्हेसाम्राज्याचा विस्तार केला असून मोठ्या आसामींना धमकावत वसुली सुरू केली होती. कोलकाता येथील अशाच एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे. त्यासोबतच अन्य राज्यांमध्येही गुन्हे दाखल होण्याचे सत्रच सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
संतोषसह त्याच्या दोन साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला पुन्हा अटक करण्यासाठी पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे. त्याने लकडगंजमध्ये राहणाऱ्या एका डॉक्‍टर तरुणीवर ती 16 वर्षांची असल्यापासून लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अत्याचार व पोक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात त्याला अटक करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. आणखी गुन्हे दाखल झाल्यास आंबेकरच्या अडचणींत अधिकच भर पडणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don santosh ambekar, crime