डॉन संतोष आंबेकरचा आणखी एक कारनामा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

आरोपी विवेकसिंह ठाकूर याचे आठ रस्ता चौकात कॉपर सलून नावाने पार्लर आहे. या पार्लरमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विवेक ठाकूर हा "फ्रर्स्ट टाईम फ्री टेस्ट'च्या नावाखाली फोन करून आमिष दाखवत होता. त्याच्या सलूनमध्ये मुलींना वेगवेगळी आमिष दाखविण्यात येत होती.

नागपूर : आठ रस्ता चौकात असलेल्या एका पार्लरमध्ये एका 16 वर्षाच्या तरुणीवर डॉन संतोष आंबेकरने बलात्कार केला. त्या तरुणीला पार्लरमालकाने दबाव टाकून आंबेकरला सहकार्य करण्यास भाग पाडले. या प्रकरणी डॉन आंबेकर आणि पार्लरमालकावर क्राईम ब्रॅंचने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सध्या पार्लरचा मालक विवेकसिंह ठाकूरला अटक केली. त्याला 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

कॉपर सलूनमध्ये कुकृत्य 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विवेकसिंह ठाकूर याचे आठ रस्ता चौकात कॉपर सलून नावाने पार्लर आहे. या पार्लरमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विवेक ठाकूर हा "फ्रर्स्ट टाईम फ्री टेस्ट'च्या नावाखाली फोन करून आमिष दाखवत होता. त्याच्या सलूनमध्ये मुलींना वेगवेगळी आमिष दाखविण्यात येत होती. अल्पवयीन मुलींना मेकअप किट किंवा आर्थिक मदतीच्या नावाखाली विवेक ठाकूर हा जाळ्यात ओढत होता. 

सलून मालकाला अटक 
जाळ्यात अडकलेल्या मुलींना सुरूवातीला सर्व काही नि:शुल्क दिल्या जात होते. त्यानंतर मात्र, तो स्वतः अश्‍लील चाळे किंवा शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. अशाच प्रकारे लकडगंज हद्दीत राहणारी एक महाविद्यालयीन 16 वर्षीय विद्यार्थिनी विवेक ठाकूरच्या जाळ्यात अडकली. तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. तिच्यासोबत चॅटिंग केल्यानंतर त्याने सलून आणि सुविधांबाबत बोलणी केली. त्यानंतर त्याने तिला सलूनमध्ये बोलावले. तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आमिष दाखवले. 

हेही वाचा - डॉन आंबेकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

वादात अडकलेले घराचे प्रकरण 
पीडित तरुणीच्या घराच्या प्रकरणावर नातेवाइकांमध्ये वाद सुरू होता. ते प्रकरण तिने सलून मालक विवेकसिंहला सांगितले. त्याने डॉन आंबेकरचे नाव सांगून प्रकरण सोडवून देण्याचे आश्‍वासन दिले. घराचा वाद सोडविण्याच्या नावाखालीसुद्धा विवेकने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्याने डॉन आंबेकरशी भेट घालून देणार असल्याचे सांगितले होते. 

डॉन आंबेकरचे कौर्य 
फेब्रूवारी महिन्यात पीडित मुलगी आणि विवेक कारने आंबेकरला भेटायला जात असतानासुद्धा विवेकने तिच्याशी कारमध्ये अश्‍लील चाळे केले. त्यानंतर आंबेकरच्या कायालर्यात तिला नेण्यात आले. आंबेकरने तिला संपत्ती वाद सोडविण्यासाठी शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच आंबेकरने तिच्या डोक्‍यावर पिस्तूल ठेवले व तिच्यावर बलात्कार केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don santosh ambekar molested girl in saloon at nagpur