esakal | "राजकारणी नव्हे समाजकारणी नेत्याला निवडून द्या"; संदीप जोशींच्या सभेत डॉ. परिणय फुके यांची जनतेला साद 
sakal

बोलून बातमी शोधा

dont vote for politician vote for social worker said Parinay Fuke

पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या,

"राजकारणी नव्हे समाजकारणी नेत्याला निवडून द्या"; संदीप जोशींच्या सभेत डॉ. परिणय फुके यांची जनतेला साद 

sakal_logo
By
राजेश चरपे

भंडारा-गोंदिया : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तशी तशी प्रचारसभांची संख्याही वाढत चालली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे झंझावाती दौरे सुरु झाले आहेत. आपला उमदेवार विरोधी उमेदवारापेक्षा चांगला  आहे हे पटवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते गुंतले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भंडारा गोंदिया  इथे झालेल्या सभेत डॉक्टर परिणय फुके यांनी संदीप जोशी यांचा प्रचार केला.  

सविस्तर वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.

भाजप, रिपाई (आ), बरिएम व खोरिप महायुतीचे उमेदवार संदीप जोशी यांच्या मोहाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. लाखनी येथील प्रचारसभेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने सुद्धा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थन दिले. 

संदीप जोशी यांनी लाखनी शहरातील समर्थ विद्यालयात दिवंगत बापुसाहेब लाखनीकर यांच्या स्मृतीला वंदन केले व शिक्षकवृंदांशी संवाद साधला. संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता.२४) भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, जवाहरनगर आदी ठिकाणी संपर्क दौरा केला.

हेही वाचा - आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण

विनोद अग्रवाल यांचेही समर्थन

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही संदीप जोशी यांना पूर्ण समर्थन दिले. समर्थनासह विनोद अग्रवाल यांनी गोंदिया शहरातील विशाल लॉन येथे भव्य सभा घेतली.   

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image