esakal | जंगलात नेमके काय घडले? त्याने सायंकाळी केला शालूचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

जंगलात नेमके काय घडले? त्याने सायंकाळी केला शालूचा खून

जंगलात नेमके काय घडले? त्याने सायंकाळी केला शालूचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जांबुळघाट (जि. चंद्रपूर) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीला कुऱ्हाडीने संपविले. ही घटना चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथील जंगम वस्तीत मंगळवारी चार वाजताच्या सुमारास घडली. शालू बबलू सिंदेवार (वय ३८, रा. जांभुळघाट) असे मृत महिलेचे नाव आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बबलू मारोती सिंदेवार (वय ४०) हा पत्नीला सरपण आणण्याच्या बहाण्याने जंगलात घेऊन गेला होता. (Doubt-over-character-Husband-Killed-Wife-Murder-News-Chandrapur-Crime-News-nad86)

भिसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जांभुळघाट येथील जंगल वस्तीत राहणारे बबलू सिंदेवार व पत्नी शालू सिंदेवार हे दाम्पत्य भंगारचा व्यवसाय करून उपजीविका करीत होते. त्याच्या संसार वेलीवर दोन अपत्य आहेत. एका मुलीचे लग्न झाले तर मुलगा पंधरा वर्षांचा आहे. काही काळानंतर बबलू पत्नी शालूच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

बबलुला संशय शांत बसू देत नव्हता. त्यामुळे त्याने पत्नीला कायमचे संपवण्याचा निश्चय केला. मंगळवारी सकाळी पत्नीला प्राथमिक आरोग्य केंद्रामागील जंगलात सरपण आणण्यासाठी घेऊन गेला. मात्र, बबलूच्या मनात वेगळेच होते. त्यामुळे त्याने शालुला कुऱ्हाडीने वार करून ठार केले व प्रेत झुडपात ठेवले. या घटनेची चर्चा जांबुळघाट परिसरात पसरली.

घटनेची माहिती स्वतः बबलूने जंगम वस्तीत येऊन दिली. घटनेची माहिती पोलिसांना झाली. भिसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज गभने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बागाटे यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास भिसी पोलिस करीत आहेत.

(Doubt-over-character-Husband-Killed-Wife-Murder-News-Chandrapur-Crime-News-nad86)

loading image