Dr Babasaheb Ambedkar
esakal
अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावाच्या विकासाकडे राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप भीमशक्ती संघटनेने केला आहे. आंबवडे येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या विकासकामांना गेल्या आठ वर्षांपासून ब्रेक लागला असून शासनाने मंजूर केलेला दोन कोटी रुपयांचा निधी अद्याप खर्च झालेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच या ठिकाणी जागतिक दर्जाचे स्मारक उभारून त्याचा सर्वांगीण विकास करण्याची मागणीही करण्यात आली आहे.