डॉ. बंग दाम्पत्याचा आज डी.लिट.ने होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

गडचिरोली : अवघे आयुष्य आरोग्य आणि समाजसेवेत झोकून देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मंगळवारी (ता. 30) डॉक्‍टर ऑफ लिटरेचर(डी. लिट.) पदवीने गौरविले जाणार आहे.

गडचिरोली : अवघे आयुष्य आरोग्य आणि समाजसेवेत झोकून देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मंगळवारी (ता. 30) डॉक्‍टर ऑफ लिटरेचर(डी. लिट.) पदवीने गौरविले जाणार आहे.
सह्याद्री राज्य अतिथी गृह मुंबई येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे चौथ्या विशेष पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात डॉ. बंग दाम्पत्यास डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसकर हे उपस्थित राहतील. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील,
यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य 32 वर्षांपासून करीत आहेत. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्यांबाबत त्यांनी तयार केलेला उपक्रम आज भारतासह अनेक देशांत राबवला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Bangla couple will be honored today by DLit