डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात योग दिवस साजरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र महासभेतील १९३ सदस्यांद्वारा मान्य करण्यात आला ही देशासाठी खुप मोठी उपलब्धी आहे. असे प्रतिपादन अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे कार्यकारी सदस्य संजय धोत्रे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला आणि डॉ.

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र महासभेतील १९३ सदस्यांद्वारा मान्य करण्यात आला ही देशासाठी खुप मोठी उपलब्धी आहे. असे प्रतिपादन अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे कार्यकारी सदस्य संजय धोत्रे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे प्रसंगी ते बोलत होते. 

या अतिशय भव्यदिव्य योग शिबिरात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय, सेवाभावी संस्थानी सहभाग नोंदवून गर्दीचा उच्चांक गाठला. याप्रसंगी, व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, माजी महापौर सुमनताई गावंडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, कर्नल रोहित शाह, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, नेहरू युवा केंद्राचे हरिहर जिराफे, जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांचेसह पतंजली योग समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. योग प्रशिक्षक भारती शेंडे यांनी उपस्थितांना योग - प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह धडे गिरविले ज्याला सभागृहाने उत्स्फूर्त पणे साथ दिली. 

या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय व कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात जिल्हा स्तरीय योग समिती, नेहरू युवा केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, जिल्हा क्रीडा संकुल समिती, शारीरिक शिक्षण महासंघ, योग फोरम, पतंजली योग समिती, अजिंक्य फिटनेस पार्क, इंडिअन मेडिकल असोसिएशन, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड, योग परिषद,योगासन सांस्कृतिक मंडळ, ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय, स्वयंसिद्ध प्रशिक्षण केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र, प्रजापती ग्रुप, गायत्री ग्रुप, आर्यसमाज मंडळ, योग विद्याधाम, योगसन सेवा समिती, विविध शाळा, महाविद्यालये, पोलीस विभाग, शासकीय व इतर कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 

योगसाधना हि केवळ शारीरिक शक्तीसाठीच नव्हे तर मनोविकासाकडून मन:शांतीकडे घेऊन जाणारी साधना असल्यामुळे जगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे व आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाभ्यास करणे हि काळाची गरज असल्याचे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात प्रतिपादित केले. आजच्या योग शिबिरात नवी दिल्ली येथून विशेषत्वाने उपस्थित आयुष प्रतिनिधी संस्थेच्या शहनाज यांनी आपल्या निष्णात योग्भ्यासाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी, या विशेष योगदानाबद्दल डॉ. सुहास काटे,सौ. भारती शेंडे, दीपक जसवाणी, श्वेता बेलसरे, माया भुईभार, प्रशांत वाहूरवाघ, धनंजय भगत, हरीश पारवाणी, बासरी वादक श्री. उमाळे यांचा खा. संजय धोत्रे व कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, अजिंक्य फिटनेस चे धनंजय भगत, नेहरू युवा केंद्राचे हरीहर जिराफे, यांचे सह पतंजली समूहाने व विविध संस्थांनी अथक परीश्रम घेतले. सभागृहात तुडुंब गर्दी झाल्याने बास्केटबॉल मैदानात डिजिटल स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करून अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University celebrates Yoga Day