शरद पवार रविवारी अमरावतीत

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी
Sharad Pawar in Amravati
Sharad Pawar in Amravatiesakal
Updated on

अमरावती : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी रविवारी (ता. १०) आहे. यानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उद्‍घाटन माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.रविवारी सकाळी ९ वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार असून दुपारी २ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उद्‍घाटन शरद पवार यांच्या हस्ते होईल.

यासोबतच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्व. रावसाहेब इंगोले स्मृती प्रवेशद्वाराचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख राहतील. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याणमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके उपस्थित राहतील.

सोहळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, अ‍ॅड. गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशव गावंडे, केशव मेतकर, सचिव शेषराव खाडे, डॉ. महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ. पी. एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Mountain Man Tulsiram Gedam
Crime branch raid
VNIT researchers who developed a real-time backfilling technology capable of enabling up to 95% coal recovery in underground mining under suitable conditions.
Assistant Police Inspector Dnyaneshwar Zhol, who was posted at the Nagpur Police Commissionerate, died at his residence; police are investigating the circumstances surrounding the incident.
Marathi News Esakal
www.esakal.com