चक्क रस्त्यांवर खोदल्या नाल्या; वाळू चोरीला थांबवण्यासाठी नवी शक्कल; तस्करी झाली बंद 

drains are dig on road to stop theft of sand
drains are dig on road to stop theft of sand

निलज (जि. भंडारा) : निलज व परिसरातील वैनगंगेच्या घाटांवरून सतत वाळूचोरी केली जाते. याला आळा घालण्यासाठी येथील तलाठ्यांनी नवीन शक्कल लढवली असून घाटाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर जेसीबी मशीनने नाली खोदली आहे. यामुळे कोणतेही वाहन घाटाकडे जाऊ शकत नसल्याने सध्या वाळूचोरी थांबली आहे.

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचे अथांग पात्र लाभले आहे. या पात्रात जलसाठ्या बरोबरच वाळूचेही विपुल साठे उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यात वैनगंगा नदीच्या काठावर अनेक गावे आहेत. निलज बु. येथेसुद्धा वैनगंगेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहे. सध्या घाटाचे लिलाव आले नाही. त्यामुळे वाळूघाटांवर तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे. 

वाळूतस्कर संपूर्ण रात्रभर वाळूउपसा करून चोरी करतात. त्यासाठी नदीच्या काठावर असलेल्या कच्या मार्गाचा वापर केला जातो. रास्ता कच्चा असल्याने धूळ उडून शेतातील शेतमाल व पीक खराब होते. तसेच ग्रामीण रस्त्यांची सततच्या वाहतुकीने दैनावस्था होत आहे.

वाळूचोरीला प्रतिबंध लावण्यासाठी येथील तलाठी बिरणवार यांनी पोलिस बंदोबस्तात घाटांवर गस्त सुरू केली. मात्र, संधी मिळताच तस्कर सक्रिय होत होते. त्यामुळे वेगळी उपाययोजना करण्याची बाब तलाठ्यांच्या लक्षात आली. त्यांनी निलज बु. येथील घाटावर जेसीबी मशीन चालकाला सर्व रस्त्यांवर वाहन जाऊ नये अशी नाल्या खोदण्यास सांगितले. आता नदीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठमोठ्या नाल्या खोदून रस्ते बंद केले. याचा चांगला परिणाम दिसून आला असून, घाटाकडे दोन दिवसांत एकही वाहन गेले नाही. तूर्तास प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे निलज बु घाटातून वाळू तस्करी बंद दिसत आहे.

प्रभावी उपाय का होऊ नये?

जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन संभाव्य संकट टाळण्यासाठी उपाययोजना करू शकते. दुष्काळात जिल्ह्यातून पशुचारा व धान्याची वाहतूक करण्यास बंदी केली जाते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी व तलावातील पाण्याचे अधिग्रहणही केले जाते. मग, वाळूचोरीच्या समस्येवर प्रशासन असा उपाय कां करत नाही? वैनगंगेच्या वाळूपेक्षा बारीक वाळू राजस्थानातील वाळवंटात आहे. तेथून वाळूची कधीही तस्करी होत नाही. भंडारा जिल्ह्यात दरवर्षी वाळूचोरीतून पोलिस, महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. संबंधित गावकरी व पदाधिकाऱ्यांना चोरटे धमक्‍या देतात. मग, जिल्हा प्रशासन यावर प्रभावी उपाययोजना का करत नाही? हा मोठा प्रश्‍न आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com