राज्यातील रोपवाटिकांवर ड्रोनची नजर 

संदीप रायपुरे
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट व्हावी यासाठी ड्रोन च्या सहायाने रोपवाटिकांतील स्थितीचे चित्रण करण्यात येत आहे.

गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट व्हावी यासाठी ड्रोन च्या सहायाने रोपवाटिकांतील स्थितीचे चित्रण करण्यात येत आहे.

पर्यावरण समृध्दीचा नारा देत चालू वर्षात राज्यात तेरा कोटी वृक्षलागवड करण्यात आली. राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हि मोहिम यंदा फत्ते करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यात येत्या सत्रात 33 कोटी वृक्षलागवडीची जंम्बो मोहिम राबविण्याचा संकल्प केला आहे. याची जबरजस्त तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील वनविभागाच्या व वनविकास महामंडळाच्या रोपवाटिंकांत रोपटे तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. रोपवाटिकांतील रोपांची स्थिती कशी आहे. त्याचे संगोपन निटपणे होत आहे कि नाही, यासोबतच संबधित कामाबाबतीत पारदर्शकता असावी यासाठी रोपवाटिकांत असलेल्या संपुर्ण क्षेत्रावर ड्रोन कॅमेराच्या सहायाने चित्रण करणे सुरू झाले आहे. रोपवाटिकांची पाच छायाचित्रे व ड्रोन न घेतलेल संपुर्ण चित्रण विभागाच्या वेवसाईट वर अपलोड करण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत. 

यादृष्टीने आता या कामांना गती आली आहे. चंद्रपूर जिल्यातील वनविकास महामंडळाच्या कन्हाळगाव 2 या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रं 139 मध्ये  25 हेक्टर रोपवाटिकांतील संपुर्ण चित्रण नुकतच ड्रोनच्या सहायान पार पडले. राज्यातील संपुर्ण रोपवाटिकातील चित्रण करण्याच काम आता सुर झालेल आहे. हिरव्या महाराष्ट्राच स्वप्न बघत त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणारे सुधीर मुनगंटीवार हे या उपक्रमासंदर्भातील हालचालीवर स्वत लक्ष ठेउन आहेत. रोपवाटिकात उगविणा-या रोपांपासून ते लागवडीसाठी होईपर्यत सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी आता संबधीत यंत्रणेवर असल्याने कामात कुचराई करणा-यांनाही यातून चांगला आवर घालणे शक्य होणार आहे.

राज्यातील सर्व घटकांच्या सहकार्याने तेरा कोटी वृक्षलावगडीची मोहिम फत्ते झाली. हिरव्या महाराष्ट्राचे स्वप्न बघत आता 33 कोटी वृक्षलागवडीची मोहिमेची संकल्पना आहे. याची पुर्वतयारी म्हणून रोपवाटिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रोंपाच्या पुर्ण परिसरावर ड्रोन कॅमेरातून चित्रण करणे सुरू झाले आहे. हे चित्रण सर्वाना बघता यावे यासाठी संबधीत वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे.
 - सुधीर मुनगंटीवार, वित्त व वनमंत्री महाराष्ट्र सरकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drown eye on nurseries in the state