औषध विक्रेत्याने डॉक्टरला फोन करून सांगितले पैसे पाठवले अन् सरकली पायाखालची जमीन

Drug dealer cheated by hacking doctor's Facebook account
Drug dealer cheated by hacking doctor's Facebook account

आर्णी (जि. यवतमाळ) : वैद्यकीय अधीक्षक असलेल्या डॉक्टराचे फेसबुक अकाऊंट हॅक करून हॅकरने चक्क मेडिकल स्टोर्सच्या मालकालाच गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील बोरगाव येथे ही घटना मंगळवारी (ता. २६) घडली.

आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भवरे यांचे फेसबुक अकाऊंट झाले. त्यांचे हजारो मित्र आहेत. हॅकरने त्यांचे अकाऊंट हॅक करून मेसेंजरच्या माध्यमातून बोरगाव येथील औषध विक्रेते लियाकत शेख यांना मेसेज पाठविला. त्यात तातडीने पुनित शर्मा यांच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ८ हजार ९०० रुपये गुगल पे करण्याची विनंती केली.

लियाकत शेख यांनी पहिल्यांदा ८ हजार व दुसऱ्यांदा ९०० असे ८,९०० रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी डॉ. सुनील भवरे यांना भ्रमणध्वनीवर पैसे पाठविल्याचे सांगितले. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी आपण कुणालाही पैसे पाठविण्याबाबत सांगितले नसून त्यांचे अकाउंट कोणीतरी अनोळखी व्यक्तीने हॅक केल्याचे सांगताच लियाकत शेख यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती.

पैशाचा व्यवहार करू नका
माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. याप्रकरणी आर्णी पोलिसांत तक्रार देत आहे. कुणीही माझ्या नावाचा वापर करून पैशाची मागणी केल्यास पैशाचा व्यवहार करू नये.
- डॉ. सुनील भवरे,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आर्णी

व्यवहार करताना सावध राहण्याची गरज
मेसेंजरवरून संदेश पाठवून फसवणूक केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. कोणी यापुढे फेसबुक, मॅसेजरवर विश्वास ठेवून ऑनलाईन पैश्याचा व्यवहार करू नये. माझ्यासारखी इतराची फसवणूक होऊ शकते. यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याची आहे.
- लियाकत शेख,
औषधविक्रेता, बोरगाव ता. आर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com