Drug Purchase Scam: औषध खरेदी घोटाळा प्रकरणी औषध निर्माण अधिकारी निलंबित
Gadchiroli News: गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी औषध निर्माण अधिकारी महेश देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्थिक अनियमिततेमुळे ही कारवाई झाली आहे.
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुचर्चित औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी औषध निर्माण अधिकारी महेश प्रभाकर देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर येथील आरोग्य सेवा उपसंचालकांनी आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत हे निलंबनाचे आदेश दिले आहेत.