
लाखांदूर : दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ करणाऱ्याला हटकल्यामुळे त्याने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना ओपारा येथे घडली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपी विनोद उर्फ पिंटू लांजेवार याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.