अकोल्याच्या चांदण्याचे नक्षत्राला देणं !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

 • सहाव्या अ.भा.मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन ओझरला
 • संमेलनाध्यक्षपदी लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड
 • संमेलनात फुलणार वऱ्हाडी भाषेचा काव्यमळा
 • दर दोन वर्षांनी या संमेलनाचे आयोजन

अकोला :  अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन पुणे जिल्ह्यातील ओझर येथे मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. या महाकाव्य संमेलनाच्या महाकाव्य संमेलनाध्यक्षपदी लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड झाली असून पुणे येथील संमेलनात वऱ्हाडी भाषेचा काव्यमळा ते फुलविणार आहेत.

नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे यांच्यावतीने २२ व २३ फेब्रुवारी २०२० रोजी ओझर येथे आयोजित महाकाव्यसंमेलनात प्रत्येक कवी, कवयित्रींना सहभाग विनामुल्य असतो. प्रत्येकाला काव्यवाचनाची संधी दिली जाते. काव्यमंचच्या वतीने दर दोन वर्षांनी या संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सहाव्या महाकाव्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी लोककवी डॉ.विठ्ठल वाघ यांच्या निवडीने साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यांनी भूषविले संमेलनाध्यक्षपद
अ.भा.मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनाच्या प्रथम संमेलनाध्यक्ष महाराष्ट्रभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर, दुसरे सुप्रसिध्द कवी प्रा.इंद्रजित भालेराव-नागपूर, तिसरे कवी तथा अर्थतज्ज्ञ एस.के.कुलकर्णी-सांगली, चौथे सुप्रसिध्द कवी गीतकार प्रा.प्रवीण दवणे-मुंबई, पाचवे कवी मधू मंगेश कर्णीक यांनी अध्यक्षस्थान भूषविलेले आहे.

 

सन्मान

 • पुण्याचे औंध साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
 • पहिल्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२८-११-२००७)
 • अकोल्याचे ९ वे कामगार साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
 • पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन -संमेलनाध्यक्ष
 • अंबाजोगाई येथील बोली साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
 • २०१० सालचे मुखेड येथे झालेले मायबोली साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
 • देहू येथे भरलेले २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
 • कारंजा-लाड येथील ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
 • सोळावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २००९, औरंगाबाद--संमेलनाध्यक्ष
 • २ मार्च २०१०ला ’चांदूर रेल्वे’ येथे भरलेले ४थे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
 • १३ जानेवारी २०११ला अकोट येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलनात ‘समकालीन ग्रामीण साहित्य : डॉ. विठ्ठल वाघ गौरवग्रंथ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
 • सुलतानपूर येथे कविवर्य ना.घ. देशपांडे साहित्य नगरीत झालेल्या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक, ३ जानेवारी २०१०.
 • १ले कृषी साहित्य संमेलन, सोलापूर येथे २३ एप्रिल २०११; उद्‌घाटक आणि संमेलनाध्यक्ष
 • संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन, नागपूर अध्यक्ष विठ्ठल वाघ - २५ फेब्रुवारी २०१३
 • अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr.vitthal-wagh-chairperson-kavya-sanmelan