Yash Phale
sakal
चंद्रपूर - आपसी वैमनस्यातून पंचवीस वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना आज बुधवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरातील कोयना गेटजवळ घडली. मृतकाचे नाव यश हरिदास फाले (वय २५) असे आहे. आरोपी प्रफुल चिमणकर(वय ५५) यांच्यासह यशचे दोन मित्र या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.