
खामगाव (जि. बुलडाणा) : वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीने खामगाव, नांदुरा तालुक्यात पुन्हा थैमान घातले असून, अवकाळी शेतकऱ्यांचा पाटगात सोडायला तयास नसल्याचे चित्र दिसत आहे. पावसामुळे गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसानीची मदत लवकरात-लवकर जाहीर करण्याची मागणी परिसरात जोर धरत आहे.
क्लिक करा- पोलिस गस्तीवर; चोराच्या नजरा दानपेटीवर
पळशी बु. मध्येही पावसाचा कहर
परिसरात आठवडाभरात दुसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. येथे गेल्या सोमवार 9 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान आकाशात एकाकी ढगाळी वातावरण निर्माण होवून वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यात रामेश्वर महाराज मंदिरावरील टिनपत्रे व आठवडी बजारातील व्यपाऱ्यांचा भाजीपाला वाहून गेल्याने अनेकांचे नुकसान झाले होते. वीज खांब उलमळून जमिनीवर कोसळला होता. यावेळी लाईट गेल्यामुळे जिवीत हानी टळली असून शेतकरी बांधवांच्या शेतातील गहू हरभरा कांदा व भाजीपाला आदी पिकांचा तोंडी आलेला घास या पावसामुळे हिरावल्या गेल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत होते. या घटनेला आठवडा उलटून जात नाही तोच मंगळवार 17 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पुन्हा तुरळक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. या अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे, यंदा उन्हाळ्याचा दुसरा मार्च महिना मागे जाण्याच्या मार्गावर पोहचला तरी परिसरात उन्हाळी वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत नाही.
वसाडीत सोंगणीआधीच नुकसान
पाच वर्षापासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे सुखावलेला शेतकरी कर्जबाजारी करून पुन्हा जोमाने पेरणी करून सुगीचे दिवस पाहत असतानाच तोंडाशी आलेले पीक कपाशी तथा ज्वारी कापणी करण्याअगोदरच पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतामध्येच कणसांना कोम आल्यामुळे एकही दाना घरात आला नाही. मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे रब्बीचे पीक घेण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागला होता. परंतु पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून वादळी वाऱ्यासह पाऊस होऊन शेतातील सोगणी अगोदरच गहू, हरभऱ्याचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी निराशेच्या खाईमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. तरी शासनाने नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाई करावी.
पोरजमध्ये कांदा, गहू, मका पिकांचे झालेले नुकसान
पोरज, तांदुळवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी 5 वाजता परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे गहू पीक पूर्णपणे झोपले आहे. तसेच कांदा पिकाचे पात गारपिटीने छाटली गेली. केळी व मका पिकाचे पाने फाटली आहेत. त्यामुळे पिके उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अगोदरच खरिपाच्या हंगामात पडलेल्या ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, कांदा, मका, केळी या पिकांवर मोठ्या प्रमाणात भर दिला होता. पिके जोमात डोलू लागली होती. परिसरातील प्रकल्पामध्ये पाणी मुबलक असल्यामुळे पोरज गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांवर बी-बियाणे, खते, कीटकनाशके खर्च केला होता मात्र पिके काही दिवसांमध्येच हाताशी येत असताना या पिकांना नख लावण्याचे काम या गारपीट वादळी वाऱ्याने केली आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत बळीराजा सापडला असून, त्याला मोठ्या आर्थिक नुकसान भरपाईची गरज असून शासनातर्फे लवकरात लवकर या परिसरात येऊन पंचनामे करण्यात यावे व योग्य अशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात यावी आतापर्यंत ओल्या दुष्काळाची हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहे. तरी शासनाने या गोष्टीची दखल घेऊन ओल्या दुष्काळाचेही अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
अधिकाऱ्यांनी पाहणी करावी
आज झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊसामध्ये कांदा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सबंधित अधिकाऱ्यांनी येऊन प्रत्यक्ष शेतात पाहणी करावी.
-ओमसिंग बोराडे, शेतकरी पोरज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.