
धामक : नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १३४ रेशन दुकानांची संख्या आहे. धान्याची उचल करणाऱ्या लाभार्थ्यांना पॉस मशीनद्वारे ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. त्याकरिता प्रत्येक रेशन लाभार्थ्याने दुकानात जाऊन ईकेवायसी करून घ्यावी, अन्यथा रेशन बंद करण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.