

Vidarbha Child Labour
sakal
नागपूर : विदर्भात बालमजुरीचे भयावह चित्र पुन्हा एकदा समोर आले आले. बालकामगारांचे उघड शोषण केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. अपर कामगार आयुक्तांनी वर्षाभरात राबविलेल्या विशेष छापासत्रात तब्बल ४१ आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या आणि त्यातून ६४ बालमजुरांची सुटका करण्यात आली. या कारवाईने प्रशासनालाच नव्हे तर समाजालाही हादरा बसला आहे.