esakal | नागपूर डब्बा ट्रेडिंगवर ईडीची टाच
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर डब्बा ट्रेडिंगवर ईडीची टाच

नागपूर डब्बा ट्रेडिंगवर ईडीची टाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येथील 2016 मध्ये पोलिसांनी कारवाई केलेल्या हाय प्रोफाईल डब्बा ट्रेडिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2016 मध्ये डब्बा व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचा संपूर्ण तपास केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात गुन्हे दाखल केले.
नागपुरातून मुंबई येथे व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या या डब्बा व्यावसायिकांसह इतरही डब्बा व्यावसायिकांवर अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नजर ठेवून आहे. त्यातील तीन डब्बा व्यावसायिकांची अद्याप ओळख पटू शकलेली नसली तरी नागपूर हे डब्बा व्यावसायिकांचे हब असल्याचे यावरून उघड झाले आहे. हे व्यावसायिक स्थानिक दराच्या आधारावर डब्बा ट्रेडिंग करीत होते असा संशय होता. याशिवाय सिंगापूर एक्‍स्चेंज लिमिटेड, निफ्टी, नॅसडॉक किंवा दुबई गोल्डसह विदेशी चलनाची देवाणघेवाण करीत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. हे सर्वच व्यवहार हवालाच्या माध्यमातून केला जात असल्याचीही शक्‍यता व्यक्त केली जात आहे. डब्बा ट्रेडिंगच्या उलाढालीमुळे प्राप्तिकरासह इतरही करांची चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते. 2016 मध्ये नागपूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात डब्बा ट्रेडर्सवर छाप्याची कारवाई केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाचा पाठपुरावा न केल्याने सेबीला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

 
loading image
go to top