वर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन

राजेश सोलंकी
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने वर्धा जिल्ह्यात 3 जानेवारी 2019 ते सहा जानेवारी 20 19 पर्यंत हुतात्मा स्मारक सेवाग्राम वर्धा येथे तीन दिवस शिक्षणाच्या वारीचे प्रदर्शनाचे आयोजन केले असून, सर्व यंत्रणा जलद गतीने कामात लागलेली आहे.

नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुंबई कोल्हापूर वर्धा, नांदेड व जळगाव या पाच जिल्ह्यात हा उपक्रम शासनाचे निर्देशाप्रमाणे राबविल्या जात आहे. या शैक्षणिक वारी प्रदर्शनात शाळा विकास आराखडा शाळा, व्यवस्थापन समिती रचना, शाळा व्यवस्थापन समिती मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांची शाळांना अध्यापनात व कौशल्य विकासात मदत, स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग, आंतरराष्ट्रीय शाळा, गणित व भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्ययनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकाची बदलती भूमिका, शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशाळा उपक्रम, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठी शिक्षण, कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन, पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, लोकसहभाग, आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग आदीबाबतचा यात समावेश आहे.

शिक्षकांचा आत्मविश्वास अध्ययन व अध्यापन पद्धतीत बदलामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याचप्रमाणे शाळेचा उत्साह पाहता शिक्षणाच्या वारीत 50 स्टॉल राहणार आहे. शाळा महाविद्यालय यांनी आपल्या शाळेत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा समावेश या वारीत राहणार असल्याने त्यांनाही या वारीच्या माध्यमातून राज्यस्तरावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. शिक्षक नवनवीन प्रयोग करीत असल्याने व ते तंत्रस्नेही झाल्याने शिक्षणाच्या वारीत विविध वैविध्यपूर्ण स्टॉल राहणार आहे, याला विद्यार्थी नागरिक शिक्षक व शिक्षक प्रेमींनी भेट देऊन ज्ञानार्जनाच्या या गंगेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाची वारी वर्धा प्रसिद्धी विभागामार्फत करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education wari at wardha district