चिखली- मेहकर मार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी, चिखली ते मेहकर मार्गावरील घटना
Road accident
Road accidentsakal

चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, 8 एप्रिलला सकाळी मेहकर ते चिखली मार्गावरील मुंगसरी फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात दोघांना जीव गमावावा लागला आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या लोखंडी अँँगलच्या ट्रकला पाठीमागून म्हशी घेऊन येणार्‍या आयशरने जोरदार धडक दिली.

चिखली ते मेहकर रोडवर मुंगसरी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 48 एजी 7820 याला म्हशीची वाहतूक करणारे आयशर गाडी क्रमांक एमएच 20 डीइ 4465 याने धडक दिली. मेहकरकडून भरधाव वेगात चिखलीकडे जात असताना मागून येऊन उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिल्याने मोठा आवाज होताच परिसरात नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उभ्या असलेल्या ट्रकमध्ये भरीव लोखंडी अँकर होते.

प्राथमिक माहितीनुसार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. मृत्यू झालेले व्यक्ती हे औरंगाबाद येथील आहे अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तर 12 म्हशींंचा मृत्यू झाला तर 4 म्हशी गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेले व्यक्तींना बुलडाणा येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनांमधील जखमी असलेल्या म्हशीवर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर तातडीने पोलिस हजर होऊन पुढील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com