esakal | यवतमाळमधील आठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली
sakal

बोलून बातमी शोधा

four police officers transferred from yavatmal

दिवाळीपूर्वी पोलिस दलात बदली सत्र सुरू झाले आहे. यवतमाळ ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संजय शिरभाते यांना अमरावती येथील जातपडताळणी समितीत नियुक्ती मिळाली.

यवतमाळमधील आठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : जिल्हा पोलिस दलात आपला कार्यकाळ पूर्ण करणारे चार पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या परजिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्या आहेत, तर दोन पोलिस निरीक्षक गडचिरोली येथून जिल्ह्यात आले आहेत. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या आदेशाने या बदल्या दिवाळीत करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

दिवाळीपूर्वी पोलिस दलात बदली सत्र सुरू झाले आहे. यवतमाळ ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संजय शिरभाते यांना अमरावती येथील जातपडताळणी समितीत नियुक्ती मिळाली. कळंबचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांची बदली वाशिम जिल्ह्यात जिल्हा जातपडताळणी समितीत झाली. बाभूळगावचे सतीश जाधव हे नागपूर, तर अशोक नाझन यांची बदली नाशिक येथे करण्यात आली. जिल्ह्यात अजित राठोड, प्रकाश तुनकनवार हे दोन पोलिस निरीक्षक बदलून आले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशीष इंगळे, वडगाव जंगलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेश रणधीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक निखिल फटींग, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल खलसे यांचीही बदली झाली आहे.

loading image