आषाढीला ‘पांडुरंग’ सोबत नाही : खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - आषाढ पौर्णिमा आला की पंढरपूरच्या वारीची आठवण होते. मुक्ताईनगर ते मेहकर असे आषाढीसाठी पंढरपूरला सोबत जात असू. फुंडकर आणि माझे कुटुंब एकत्रच असत. यंदाची आषाढी आली, मात्र ‘पांडुरंग’च नाही, अशा भावना विधानसभेतील शोकप्रस्तावावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 

मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडल्यानंतर खडसे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. खडसे म्हणाले, मी मंत्री असताना मंत्रिमंडळात फुंडकर यांना स्थान देण्यात आले नव्हते. मी बाहेर पडल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले.

राजकारणात भाऊसाहेब आणि माझा लपंडाव सुरू होता. मंत्रिमंडळातील आतबाहेरचा हा खेळ आताही सुरू राहिला असता तरी चालले असते. परंतु, आज ते नाहीत, याचे दुःख आहे, असेही खडसे म्हणाले. फुंडकर यांनी अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे हित जपणारे निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे आंदोलन हाच त्यांचा स्थायीभाव होता. त्यासाठी कापूस दिंडी काढली. कुणबी पाटील संघाचे ते प्रणेते होते. ओबीसींची चळवळ उभारणारे नेते गोपीनाथ मुंडे यांना मोलाची साथ देत भारतीय जनता पार्टीला ओबीसीचा चेहरा देण्यातही मोलाचे योगदान होते. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, अनिल गोटे, संदीप रेड्डी, जीवा गावित, डॉ. खेडेकर, यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse ashadhi vari pandurang fundkar