esakal | #NagpurWinterSession : राजकीय भूकंप होणार, एकनाथ खडसे देणार भाजपला धक्का? 
sakal

बोलून बातमी शोधा

#NagpurWinterSession : राजकीय भूकंप होणार, एकनाथ खडसे देणार भाजपला धक्का? 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गोटातील काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. काहींच्या मते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात 20 डिसेंबरला त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

#NagpurWinterSession : राजकीय भूकंप होणार, एकनाथ खडसे देणार भाजपला धक्का? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लवकरच भाजपला धक्का देण्याची दाट शक्‍यता आहे. खडसे मंगळवारपासून नागपुरात आहेत. राषट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ ते मंगळवारी नागपुरात दाखल झाले. त्यामुळे अधिवेशन काळातच ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे झाल्यास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल. 

अधिवेशन काळातच होणार प्रवेश

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मंगळवारी दुपारी नागपुरात आगमन झाले. त्यापूर्वीच एकनाथ खडसे दुपारी 3.30 वाजता नागपुरात दाखल झाले होते. ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे थांबले होते. संध्याकाळी सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्‍लबमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांसोबतची बैठक आटोपल्यावर शरद पवार हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे गेले. तेथेच खडसे आणि पवार यांची भेट झाल्याचीही माहिती आहे. आज सायंकाळी नागपुरात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे.

क्लिक करा - #NagpurWinterSession : महापौरांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद

त्यामुळे याच कार्यक्रमात खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गोटातील काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. काहींच्या मते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात 20 डिसेंबरला त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. एकनाथ खडसे म्हणजेच नाथाभाऊंचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशारून भाजप आणि राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. 

खडसेंची नाराजी दूर करू

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्यांशी अनेक नेते संपर्क साधण्याच्या प्रयत्नात आहेत. मी ही संपर्क करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

अधिक माहितीसाठी - महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार

संघाच्या बौद्धिक वर्गाला खडसेंची दांडी

विधानसभेत धक्काबुक्की करणाऱ्या भाजप आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी अनुशासन आणि शिस्तीचे धडे दिले. बुधवारी भल्या सकाळी भाजपच्या दोन्ही सभागृहातील आमदारांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या बौद्धिक वर्गाला हजेरी लावली. त्यामुळे संघाने नेमके बौद्धिक धडे दिले की, तंबी याबाबत विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. या वर्गाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, आमदार आशीष शेलार यांच्यासह नव्यापे पक्षात आलेले आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या वर्गाला दांडी मारली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.