The subject of the attack on the mayor was raised in the Assembly
The subject of the attack on the mayor was raised in the Assembly

#NagpurWinterSession : महापौरांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद 

नागपूर : मंगळवारी मध्यरात्री महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर दुचाकीस्वार युवकांनी गोळीबार केला. नागपुरात अधिवेशन सुरू असताना गोळीबार झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटले व सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. 

महापौर संदीप जोशी कुटुंबीयांसोबत जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. सुदैवाने संदीप जोशी आणि कुटुंबीयांना कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जोशी यांना धमकीचे पत्र मिळाले होते.

संदीप जोशी जामठा जवळील रसरंजन धाब्यावर लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मध्यरात्री ते शहरात परत येत होते. त्याच्यासोबत काही अन्य गाड्याही होत्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. सर्वात शेवटी महापौर संदीप जोशी यांची फॉर्च्युनर गाडी होती. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी महापौरांच्या गाडीवर देशी कट्यातून बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या. 

महापौरच सुरक्षित नाही

शहरात अधिवेशन सुरू असून, पोलिसांचा तकडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात पोलिसांची संख्या असताना महापौरांवर हल्ला होणे म्हणजे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच ही घटना निंदनीय घटना आहे. महापौरच सुरक्षित नसतील तर अन्य नागरिकांचे काय होणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्‍त केली. 

अद्याप स्वतंत्र गृहमंत्री नाही

सत्ताधाऱ्यांकडून पाच वर्षांपूर्वी गृहमंत्री स्वतंत्र असावा अशी मागणी करण्यात येत होती. आता 20 दिवस झाले तरी स्वतंत्र गृहमंत्री नसल्याचे नाही. नागपूरच्या प्रथम नागरिकवर हल्ला झाला आहे. आता कुठे आहे तुमचा गृहमंत्री, असा प्रश्‍न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 

खडसेंची नाराजी दूर करू

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्यांशी अनेक नेते संपर्क साधण्याच्या प्रयत्नात आहेत. मी ही संपर्क करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com