‘तिसऱ्या लाटेत लहान मुलांना प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता; सज्ज राहा’

मुंबई येथून व्हीसीद्वारे आढावा घेताना पालकमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई येथून व्हीसीद्वारे आढावा घेताना पालकमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोनास्थितीची आढावा बैठक शनिवारी व्हीसीद्वारे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. (Eknath Shinde said get ready for the third wave of corona)

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. मात्र, अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याने जिल्ह्यातील ऑक्‍सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.

मुंबई येथून व्हीसीद्वारे आढावा घेताना पालकमंत्री एकनाथ शिंदे
अंगात नागोबा संचारल्यानंतर मंत्रोपचाराने कोरोना बरा करण्याचा दावा

जिल्ह्यातील १० तालुक्‍यांसाठी मंजूर केलेले १० ऑक्‍सिजन जनरेशन प्लांट तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. सोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांशी दिवसातून २ वेळा तरी संपर्क साधण्यासही सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोना स्थितीविषयी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली.

ऑनलाइन बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. सोबतच सध्या राज्यात वेगाने वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगासाठी लागणारी सारी सज्जता करण्याच्या सूचनाही केल्या. या आजाराचे औषध महाग असल्याने त्यांचा पुरेसा साठा आधीच करून ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई येथून व्हीसीद्वारे आढावा घेताना पालकमंत्री एकनाथ शिंदे
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

मॉन्सून परिस्थिती जाणली

जिल्ह्यातील मॉन्सून परिस्थितीचा आढावादेखील पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यातील नागरिकांना ३ महिन्यांचा रेशन पुरवठा करणे, सर्पदंश आणि विंचूदंश यावरील औषधांचा साठा सर्व तालुक्‍यांतील आरोग्य केंद्रात करून ठेवणे. जिल्ह्यातील गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवणे, अशी सर्व मॉन्सूनपूर्व कामे वेळीच पूर्ण करावीत. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करावा लागणारा औषधांचा पुरवठा १५ दिवसांत करून ठेवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

(Eknath Shinde said get ready for the third wave of corona)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com