
अमरावती : अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावर बुधवारी (ता. चार) झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात लुनावर स्वार वृद्ध जागीच ठार झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सदाशिव लक्ष्मण भगत (वय ७०, रा. कस्तुरा मोगरा), असे अपघातातील मृत वृद्धाचे नाव असल्याची माहिती फ्रेजरपुराचे पोलिस निरीक्षक नीलेश करे यांनी दिली.